भात संशोधन केंद्रात कापणीला सुरुवात

| नेरळ | वार्ताहर |

दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. तेथे भाताच्या विविध वाणांचा शोध लागला आहे. सह्याद्री हे संकरित वाण जगातील शेतकऱ्यांना देणाऱ्या कर्जत भट संशोधन केंद्रामध्ये उन्हाळी भाताची शेती केली जाते. यावर्षी सह्याद्री-3 हे संकरित वाणाची शेती करण्यात आली असून हे वाण विकसित करण्याचे दृष्टीने अभ्यास केला जात आहे. दरम्यान, कर्जत शहरालगत असलेल्या जमिनीवर बहरलेला भाताची शेतीची कापणी सुरु आहे.

भात संशोधन केंद्रात भाताचे वेगवेगळी वाण शोधण्यात कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. या ठिकाणी भात संशोधन केंद्राकडून पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात भाताची शेती केली जाते. भाताच्या वाणांचा शोध घेणारे भात संशोधन केंद्र म्हणून कर्जत भात संशोधन केंद्राची ओळख आहे. यावर्षी भाताची शेती अधिक चांगली फुलली होती आणि भाताचे पीक कापणीला आले असल्याने त्याची कापणी सुरु आहे. यावर्षी सह्याद्री तीन या वाणाची अभ्यास शेती केली आहे. यापूर्वी कर्जत भात संशोधन केंद्राने सह्याद्री 1, सह्याद्री 2, कर्जत 1 ते 7 असे वाण शोधून काढले आहेत. त्या संकरित वाणांची शेती अख्या देशात केली जात असून आता सह्याद्री 3 साठी अभ्यास या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ करीत आहेत.

Exit mobile version