कर्जतमध्ये यंत्राच्या सहाय्याने भातकापणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने भाताच्या शेतीचे नुकसान झाले आहे. भाताच्या पिकाचे आणखी नुकसान होऊ नये यासाठी गौरकामत भागातील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भाताची कापणी करीत आहेत. या भागातील 35 एकर जमिनीवरील भाताची कापणी करण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने जरी नुकसान केले असले, तरी यांत्रिकीकरणाचा शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.

तालुक्यात मोठ्या पप्रमाणात दुबार भाताची शेती केली जाते. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गारपीट झाल्याने भाताच्या शेतात पाणीच पाणी काही दिवस साचून राहिले होते. त्यामुळे भाताची कापणी करून भाताचे पीक सुखरूपपणे घरात नेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु होती. त्यावेळी या सर्व शेतकर्‍यांच्या मागे निल इनपुट या संस्थेच्या माध्यमातून कम्बाईन हार्वेस्टरचे सहाय्यतेसाठी भाताची कापणी करण्यासाठी मदत केली. निल इनपुटचे नैनेश दळवी यांनी गौरकामत यांनी त्या गावातील प्रशांत जोशी यांच्या शेतात तसेच त्या गावातील भातशेती करणारे शेतकरी सुनील भागवत, अनिल देशमुख, प्रसाद जोशी, मोहन राणे यांच्या तब्बल 35 एकर जमिनीमधील भाताची यंत्राच्या साहाय्याने केली गेली. त्यामुळे भाताची कापणी करण्यासाठी या शेतकर्‍यांना मजूर घ्यावे लागले नाही.

गौरकामत गावातील या शेतकर्‍यांनी भाताची कापणी यंत्राच्या साहाय्याने केली आहे.त्याचवेळी भाताची पेरणी हीदेखील टोकरणी पद्धतीने ड्रम सिडरच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात केली होती. कर्जत तालुक्यात यांत्रिकीकरणातून भाताची शेती करण्यावर शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. याप्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड तसेच मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version