पेगासस प्रकरणी याचिकाकर्त्यांना फटकारलं
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेगासस हेरगिरी प्रकरणी याचिका करणार्यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीवेळी चांगलेच फटकारलं.सोशल मीडियावर समांतर चर्चा करू नका.व्यवस्थेवर थोडा तरी विश्वास विश्वास ठेवा,असं सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितलं. पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आता सोमवारी होणार आहे. सर्वांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमना सुनावणीवेळी म्हणाले.
कुणीही मर्यादांचे अल्लंघन करू नका. या प्रकरणी सर्वांना संधी दिली जाईल,असं सरन्यायाधीश याचिकाकर्त्यांना आणि सॉलिसिटर जनरलना म्हणाले.तसंच सोशल मीडियावर समांतर चर्चेपासून दूर राहा,अशी ताकीदही कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली. जे काही सांगायचं आहे, ते न्यायालयात सांगा.तुम्ही एकदा न्यायालयात आला तर तिथेच युक्तीवाद करा,असं निरीक्षण नोंदवत याचिकाकर्त्यांना सुनावलं. सॉलिसिटर जनरलनी आणखी वेळ मागितल्याने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.