सत्तेचा ताम्रपट घेऊन शिंदे, फडणवीस आलेत का?;अजित पवारांचा सवाल

| मुंबई | प्रतिनिधी |
 राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हा जनतेचा अपमान असून,मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या  एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत काम केलं  होते  तेच आता कामांना स्थगिती देतं आहेत. शिंदे,फडणवीस हे काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही हल्लाबोल केला आहे. याशिवाय त्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणीही केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना  राज्य सरकारवर टीका करत  मंत्रिमंडळ विस्तार न होण हा जनतेचा अपमान  अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जर सरकारकडे बहुमत आहे तर सिद्ध करा, असंही ते म्हणाले. याशिवाय 25 जुलै उजाडल्यानंतरही पावसाळी अधिवेशन अद्याप झालं नसल्याने यावरही पवारांनी टीका करत सरकारला जाब विचारला आहे.  मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पण जनतेचं काय? अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमत आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्‍न मांडता येतात परंतु जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही. असं अजित पवार म्हणाले आहेत. 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version