ओमिक्रॉनमुळे धोका; युकेमध्ये एका दिवसात 78,610 कोरोना रुग्णांची नोंद

। मुंबई वृत्तसंस्था ।
सध्या जगावर ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचं संकट आहे. त्यातच ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युनायटेड किंगडममध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून बुधवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सुमारे 78,610 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून ही संख्या जानेवारीमध्ये नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 10 हजाराने जास्त आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
ब्रिटनमध्ये नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकळू घातला आहे. याचठिकाणी ओमिक्रॉनच्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही कोरोनाची नवी लाट असल्याचा इशारा दिला आहे. सुमारे 67 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या युनायटेड किंगडममध्ये आतापर्यंत 11 दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.येत्या काही आठवड्यांत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने सांगितले आहे. तसेच या लाटेत सर्वाधिक धोका असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पाहिली असता संक्रमणाचा धोका अधिक आहे, असे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे मुख्य कार्यकारी जेनी हॅरी यांनी म्हटले होते.

Exit mobile version