एचसीएएचचे पहिले ट्रांझिशन केअर केंद्र सुरू

| पनवेल | प्रतिनिधी |

अग्रगण्य हॉस्पिटलबाह्य शुश्रुषा कंपनी असलेल्या एचसीएएच या कंपनीने महाराष्ट्रातील पहिले ट्रांझिशन केअर केंद्र (टीसीसी) खारघर येथे सुरू करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून एचसीएएचचा पश्चिम भारतात प्रवेश केला आहे. नवी मुंबई आणि जवळपासच्या भागातील लोकांना विविध सेवा प्रदान करून दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील याची हमी देणे, हे टीसीसीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये दीर्घकालीन गहन शुश्रुषा, कुशल नर्सिंग, जेरियाट्रिक केअर आणि आंतररुग्ण पुनर्वसन यांचा समावेश आहे.

टाळता येण्याजोगे अपंगत्व कमी करणे आणि एका जागी खिळलेल्या लोकांना हालचाल करण्यास सक्षम करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. संसर्ग विरहित अशा या नवी मुंबई केंद्राची क्षमता 40 रूग्णांची असून, येथे डॉक्टर, कुशल परिचारिका आणि प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिक सदैव उपलब्ध असतील. या केंद्रात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीची गरज आहे किंवा स्ट्रोक, मणक्याचे दुखापत, ट्रॉमा, पार्किन्सन्स, अल्झायमर आणि इतर अशा आजारातून बरे होत आहेत अशा रुग्णांना सेवा दिली जाईल.

यावेळी एचसीएएचचे संस्थापक आणि सीईओ विवेक श्रीवास्तव म्हणाले की, भारतात रिहॅब केअरची बाजारपेठ मोठी असून, तिचे मूल्य अंदाजे 32 अब्ज डॉलर एवढे आहे, असे ताजे अहवाल आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या मर्यादेपलीकडे सेवा देणाऱ्या ट्रांझिशन केअर केंद्रांच्या मागणीत वाढ झाली आहे. एचसीएएच इंडिया संपूर्ण शुश्रुषा क्षेत्रात पसरलेले सर्वसमावेशक हेल्थकेअर वितरण मॉडेल आणून या वाढत्या गरजा पूर्ण करेल तसेच प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एचसीएएच संपूर्ण देशात आणि इतरत्रही दर्जेदार शुश्रुषा आणण्याच्या उद्देशाने रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन अवलंबत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित हेल्थकेअर व्यावसायिकांनी सज्ज असलेले हे नवी मुंबईतील नवीन केंद्र ग्राहकांच्या वेदनांचे निराकरण करण्यासाठी कार्य करेल.

Exit mobile version