कर्जत तालुक्यातील रुग्णवाढ ठरतेय डोकेदुखी

| नेरळ | वार्ताहर |
कोरोनाने कर्जत तालुक्याला आपली कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांनंतर आज एका दिवशी तब्ब्ल 27 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, झपाट्याने होत असलेल्या रुग्णवाढीमुळे कर्जत तालुक्याचे प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य यंत्रणेकडून रुग्णवाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून बेडची उपलब्धता तपासली जात आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा अधिक जलद पसरत असल्याने कर्जत तालुक्यातून मौजमजा करून गेलेले मुंबईतही पाहुणे यांनी आता कर्जत तालुक्याला कोरोनाची भेट देऊन गेल्याचे दिसत आहे. कर्जत तालुक्यात पूर्वी एक-दोन रुग्ण आढळत होते,त्यात आता झपाट्याने वाढ होणार दिसत आहे. 5 जानेवारी रोजी चक्क 27 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.


कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय आरक्षित आहे. त्या ठिकाणी 75 बेड ची व्यवस्था असून, सर्व बेड हे सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्थेने तयार असून, त्यापैकी सात बेड हे आयसीयूसाठी आरक्षित असणार आहे. त्याचवेळी आवश्यकता वाटल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 बेडची व्यवस्था होऊ शकते. त्यासाठीच आ. महेंद्र थोरवे यांनी नवीन कक्षासाठी निधी मंजूर केला असून, तो वॉर्डदेखील सुसज्ज करण्यात येईल, अशी माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिली आहे.

Exit mobile version