| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वे गावात मुस्लिम कब्रस्थान समोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृताची ओळख पटवण्याचे काम आता पोलिसांसमोर आहे.
याबाबतीत आदगाव पोलीस पाटील जुई तोडणकर यांनी फिर्याद दिली. मृत्यू झालेल्या पुरुष जातीच्या व्यक्तीचे वय साधारण 40 वर्षे असल्याच्या अंदाज वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला. हा मृतदेह बुधवारी (4 मे) रोजी सकाळी आढळून आला आहे. समुद्राच्या पाण्याने मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ तडवी यांनी शवविच्छेदनासाठी पुढील काम केले. सहा पोलिस निरीक्षक पोमन यांच्या निर्देशानुसार पुढील तपास उपनिरीक्षक गावडे हे करीत आहेत. याबाबतीत कुणाला माहीती झाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.