मुख्याध्यापिका वनिता म्हात्रे सेवानिवृत्त

| भाकरवड | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोयनाड येथील शिक्षिका वनिता सुरेश म्हात्रे मुख्याध्यापिका या सेवानिवृत्त झाल्या. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच शकुंतला काकडे, उपसरपंच सचिन पाटील, माजी सरपंच भूषण चवरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत पाटील, सदस्य, ग्रामस्थ ज.पा. पाटील, सुरेखा पाटील, देवेंद्र केळुसकर, विजेंद्र तावडे माजी केंद्रप्रमुख सुरेंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, पालक ,माजी विद्यार्थी प्रथम संस्थेच्या प्रगती पाटील, केंद्रप्रमुख पेझारी- वि.का. पाटील, शाळेच्या शिक्षिका प्रतिभा पाटील, सुचिता पाटील विद्यार्थी यांच्या साक्षीने सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला. त्यांच्या सेवेची सुरुवात 1986 रोजी दहिवड तालुका महाड येथून झाली. अखंड सेवेचा ध्यास घेतलेल्या म्हात्रेंच्या बद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या. तर म्हात्रे बाईंनी शाळेसाठी कपाट भेट दिले. यावेळी त्यांच्या परिवारातील मुलगा रोहित म्हात्रे, सून सुजिता म्हात्रे यांनीही सहभाग घेतला.

Exit mobile version