जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या आरोग्य, नेत्र तपासणी शिबीर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रिलायन्स फाऊंडेशनच्या नागोठणे सीएसआर विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्था, रोहा यांच्या विनंतीनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे शिबीर रविवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता श्री शिव गणेश उत्सव मंडळ हॉल, नागोठणे येथे होणार आहे. शिबिरात आदिवासी बांधवांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि पुढील उपचारांबाबत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन रिलायन्स फाऊंडेशनच्या नागोठणे सीएसआर विभागाकडून करण्यात आले आहे. लायन हेल्थ फाऊंडेशन, अलिबाग यांचे वैद्यकीय व तांत्रिक सहकार्य या शिबिराला लाभणार आहे.

आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविणे, नेत्र व आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच गरजू नागरिकांना योग्य उपचाराचे मार्गदर्शन मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. शिबिराचा आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version