आरोग्य शिबीर संपन्न

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबाग आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांच्या संयुक्त विद्यमाने भारती दीनानाथ तरे सभागृह, श्रीबाग येथे रविवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 1 या दरम्यान ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 60 ज्येष्ठ नागरिकांची डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. कीर्ती साठ्ये यांनी आरोग्य तपासणी केली.

या आरोग्य शिबिरात अस्थी सांधे आरोग्य जागरुकता कार्यक्रमांतर्गत डॉ. चंद्रशेख साठ्ये यांनी अस्थीविकार टाळण्यासाठी आपला आहार कल्शियम व व्हिटॅमिन डीयुक्त असण्यासाठी कोणते अन्नप्रकार घ्यावे याचे मार्गदर्शन ज्येष्ठांना केले. त्यानंतर फिजीओथेरिपिस्ट डॉ. मनिषा मेश्राम, डॉ. पिंकी रायका यांनी ज्येष्ठांकडून हातापायाचे, कमरेचे व मानेचे व्यायामप्रकार करुन घेतले. यावेळी उपस्थित 60 ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. कीर्ती साठ्ये आरोग्य तपासणी केली. तसेच बोन डेन्सीटी तपासणीसाठी डॉ. हसील खान, मधुमेह तापसणीसाठी अमित वालेकर, तसेच सागर सावंत, प्रतिक नाईक, प्रणय घरत यांची मोलाची मदत झाली.

आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, सहसचिव प्रफुल्ल राऊत, खजिनदार जगदीश थळे, भारती तरे, शरद कोरडे, अ‍ॅड. मनोज पडते, ज्योती पाटील यांनी मेहनत घेतली. या शिबिरासाठी डॉ. अनिल डोंगरे, डॉ. सुरेश म्हात्रे, गजेंद्र दळी, पत्रकार उमाजी केळुसकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे यांनी केले. शेवटी प्रफुल्ल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून आरोग्य शिबिराची सांगता केली.

Exit mobile version