| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुका पत्रकार संघ आणि श्रीपाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सभागृहात रविवार (दि.7) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हृदयरोग तपासणी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचारही करण्यात येणार आहेत. या शिबिरात ई.सी.जी, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन लेवल, वजन, गोळ्या, औषधे, जनरल तपासणी, हांडांचे आजार, कंबरदुखी, हातापायाला मुंग्या येणे, स्त्रियांचे आजार आदीवर मोफत करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राकेश खराडे यांनी केले आहे.