लायन्स क्लब मांडवाचे आरोग्य शिबीर

 | अलिबाग । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब अलिबाग- मांडवा आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी-अलिबाग, ज्येष्ठ नागरिक संस्था भालनाका यांच्या संयुक्त विद्यमाने भालनाका येथे रविवार (दि.16) जनाधार ग्रामीण सहकारी पतपेढी, भालनाकाच्या सभागृहात अलिबाग तालुक्यातील व भालनाका परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह, रक्तदाब, हाडाची घनता, स्त्री रोग तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते. सदर शिबिरात 101 ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढीचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, अरविंद घरत, बी. एन. कोळी, धवल राऊत, मोहन पाटील, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. राजाराम हुलवान, विजयराव देशमुख, चंद्रकांत मल्हार, डॉ. शुभदा कुडतलकर, निकिता पाटील, सुमित पाटील, विकास काठे, श्रीरंग घरत, प्रफुल्ल राऊत, तुकाराम म्हात्रे, अरुण पाटील, मधुकर पाटील, नवीन राऊत,  कमळाकर राऊत, गजानन पाटील, कृष्णा दळवी, सीताराम पाटील, हरिश्‍चंद्र सानकर, विकास खोपकर, प्रकाश कानडे, संजय थळे, रवींद्र म्हात्रे, विठोबा म्हात्रे, दिलीप मलये, निलांबरी शेंबेकर आणि प्राची पाटील आदींची उपस्थिती होती. या तपासण्या लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी-अलिबागचे पथक, तसेच डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. मेधा घाटे, डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. सुभाष मोकल आदी मान्यवरांनी केल्या. यावेळी औषधांचेही वाटप करण्यात आले.

Exit mobile version