। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील चिकणी येथील डॉ.मानसी दिवेकर यांच्या दिर्घायु हेल्थ केअर (बोर्ली) व खोपोली येथील माधवबाग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चिकणी येथील प्रकृती स्टॉप जवळील भिकेश दिवेकर यांच्या निसर्ग फॉर्म हाऊस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी माधवबाग हॉस्पिटलचे डॉ.सिद्धेश महाडिक व त्यांच्या टीमने तालुक्यातील पंचक्रोशीतील लोकांची ईसीजी, रॅंडम ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, वजन, उंची, हॉर्टरेट तपासणी केली. तसेच, आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी गुरुनाथ माळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातून तसेच पंचक्रोशीतील शंभरहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.