। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिलांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आपल्या आपल्या आरोग्याचे संवर्धन करावे, योग्य आहार-विहार आणि छंदांत आपल्याला गुंतवून घ्यावे,असे आवाहन स्त्रीरोग, प्रसुती व वंधत्व तज्ज्ञ डॉ. मेघा घाटे यांनी केले. लायन्स क्लब पोयनाड, लायन्स व्हिजन अॅण्ड हेल्थ क्लिनीक आयोजित सर्व वयोगटातील स्त्रिया व वयात आलेल्या मुलींसाठी मोफत आरोग्य निदान शिबिरात 70 महिलांची (महिला व मुली) आरोग्य तपासणी करण्यात आली. ही आरोग्य तपासणी स्त्रीरोग, प्रसुती व वंधत्व तज्ज्ञ डॉ. मेघा घाटे यांनी केली.लायन्स क्लब पोयनाड, लायन्स व्हिजन अॅण्ड हेल्थ क्लिनीकचे हे आरोग्य निदान शिबीर दि. 26 ऑक्टोबर रोजी अग्रसेन भवन, पोयनाड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी नोडल ऑफिसर जीएमपी रायगड प्रदीप सिनकर, मनीष अग्रवाल, अरविंद अग्रवाल, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विनोेद पाटील, प्रगती सिनकर, विकास पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, ज्योती पाटील, ममता अग्रवाल, नीलम माळी आदींसह इतर सदस्यांनी मेहनत घेतली.