। तळा । प्रतिनिधी ।
आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या सौजन्याने प्राथमिक आरोग्य केंद्र तळामार्फत गो.म. वेदक माध्यमिक विद्यालय तळा येथे किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे रायगड भूषण उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे यांनी भूषविले. या कार्यक्रमला संस्थेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, संस्थेचे सचिव महेंद्र कजबजे, शाळा समिती चेअरमन श्रीराम कजबजे, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे तसेच रा.जि .प.शाळा तळाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोधे, सहाय्यक नरेश नांदगावकर, सहाय्यिका सविता पाटील, आरोग्यसेविका सीमा बारकुल, आरोग्यसेवक योगेश गांधी, विलास तडवी, आरोग्य समुदाय अधिकारी आशा बडे, गटप्रवर्तक नूतन ठिगळे आणि लॅब टेक्निकल सेजल शिंदे तसेच सर्व शिक्षक वर्ग मचे, मोंढे, कुलकर्णी उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गजेंद्र मोधे यांनी किशोरवयीन मुलीनी आपली काळजी कशी घ्यावी स्वच्छता, नियमित आहार, हिरव्या पालेभाज्या खाणे, मासिक पाळी दरम्यान घावयाची काळजी, प्रत्येक स्पर्श हा सुरक्षित नसतो हे समजून घेणे तसेच स्वत:चे मानसिक आरोग्य चांगले ठेवून निरोगी कसे राहू याची काळजी घेणे, असे सांगितले. तर मुळे आणि कजबजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी 265 मुलींची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सूत्रसंचालन नरेश नांदगावकर व आभार मचे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






