| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई येथील युनायटेड वे ही स्वयंसेवी संस्था कर्जत तालुक्यात कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील गरोदर माता पोषण आहारापासून मदत करणाऱ्या या संस्थेकडून गरोदर मातांची महिलांची तपासणी केली जाते. त्यांच्या या कार्याला मदत करण्यासाठी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मदत करीत असून, पहिल्या टप्प्यात 60 गरोदर मातांची आणि त्यांच्या पोटातील बाळाची अत्याधुनिक मशीन द्वारे तपासणी करण्यात आली. दरम्यान, या सर्व गरोदर मातांचे ओटी भरणे आणि आरोग्य तपासणी इत्यादी कार्यक्रमात आशा सेविका यांचा देखील सहभाग राहिला.
रायगड हॉस्पिटल आणि युनायटेड वे यांच्या प्रोजेक्ट पोषण यांच्याकडून गर्भवती स्त्रियांचे तपासणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 60 गरोदर मातांची तपासणी उपक्रमाचा शुभारंभ रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुशाग्र पटेल यांचे हस्ते करण्यात आला. रायगड हॉस्पिटलमध्ये अशा तपासणीसाठी एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या तपासणीसाठी कर्जत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील 60 गरोदर माता सहभागी झाल्या होत्या. सर्वप्रथम या सर्व गरोदर मातांची फुलांनी सजवलेल्या झोपळ्यावर बसवून ओटी भरण्यात आली. त्यानंतर या महिलांना युनायटेड वे कडून औषधांचे खास किट देण्यात आले. या महिलांची तपासणी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. यावेळी महिलांच्या तपासणी अत्याधुनिक मशीनच्याद्वारे करण्यात आली. त्या मशीनच्या आधारे माता आणि त्यांच्या पोटात असलेल्या बाळाची माहिती मिळत होती. त्या मशीनमधून विविध 54 आजार यांच्याविषयी माहिती मिळाली. यासाठी युनायटेड वेकडून रेखा जाधव, खंडू मंजिले, राजेश क्षीरसागर, अर्चना पाटील, पिंकी कवठे, वेदांती बडेकर, दीपक गुपाता, सचिन चतुरे, प्रवीण खंडवी यांच्याकडून हा उपक्रम कर्जत तालुक्यात राबविला जात आहे.





