| खांब | प्रतिनिधी |
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे विद्यार्थी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न करण्यात आला. पीबीएसके पथक अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या वतीने डॉ.सारा डोंगरकर मेडिकल ऑफिसर, डॉ.नचिकेत पाटील मेडिकल ऑफिसर, डॉ.प्रथमेश राणे फार्मासिस्ट व येथील मुख्याध्यापक दिपक जगताप, सहा.शिक्षक नरेंद्र माळी, अनुराधा मोरे, ज्योत्स्ना सबरदंडे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे वजन, उंची व शारीरिक तपासणी करून योग्य सल्ला देण्यात आला. तसेच दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.







