वृद्धाश्रमातील वृद्धाची आरोग्य तपासणी

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग मुरुड मेडिकल अससोसिएशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबीर घेऊन वेगवेगळ्या घटकातील आरोग्य सद्रड ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. त्याचाच एक भाग म्हूणन अलिबाग तालुक्यातील परहुर येथील वृद्धाश्रमातील वृद्धासाठी खास मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला. उपक्रमाला चांगला प्रीतिसाद मिळाला असून वृद्धाचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी अलिबाग मुरुड मेडिकल अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी यांनी वृद्धाना आरोग्याची काळजी कशी घ्यायची या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच वृद्धाश्रमासाटी तांदूळ तसेंच वृद्धा महिलांन करता साडी वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रणाली पाटील,डॉ सुनीत पाटील, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. सुबोध पाटील, डॉ. चेतन पाटील, डॉ. जुईली टेमकर. आदी मान्यवरासह वृद्धाश्रमाचे संचालक अ‍ॅड. श्री. गुंजाळ उपस्थित होते. वृद्धाश्रमातील 40 वृद्धाचे मोफत आरोग्या तपासणी करण्यात आली. तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत अलिबाग व मुरुड तालुक्यातील अनेक शाळेतील मुलींसाठी सॅनिटर वाटप, व आजारावरील मार्गदर्शन करण्याचा माणसं असल्याचे अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रणाली पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version