| म्हसळा | वार्ताहर |
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए.आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. श्रद्धा पाटील यांनी शिबिराच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. नलिनी जाधव, सागर सायगावकर, ज्योती महाडीक, नौशिन, अर्बिना, मनोज नाक्ती, संदिप महाजन, गोपाल गधोरी व अनेक आशासेविका उपस्थित होत्या. आरोग्य तपासणीत 74, तर डोळे तपासणीसाठी 69 लाभार्थी सहभागी झाले. आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराच्या लाभार्थ्यांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण आणि प्रा. डॉ.जगदिश शिगवण, महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.







