| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली जांभुळपाडा लोहाणा महाजन आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल-नवीन पनवेल, टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई, ओनकॉलॉजी सर्व्हिसेस-खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन 23 जानेवारी रोजी केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपोली शहर उपाध्यक्ष संजय त्यांना यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.
या शिबिराला खोपोली शहर आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलने 300 जणांनी नेत्र तपासणी केली. तर टाटा मेमोरियल सेंटर – मुंबई, ओनकॉलॉजी सर्व्हिसेस-खोपोलीकडून 100 जणांची कर्करोग तपासणी करण्यात आली.\ यावेळी कुलदीपक शेंडे, किशोर पानसरे, सुभाष पोरवाल, गुरुनाथ साठेलकर, शेखर जांभळे. मोहन केदार, मंगेश काळोखे, अजय इंगुलकर, महेश काजळे पंडित राजू ठक्कर, राजेश अभाणी, जयेश ठक्कर, मितेश शाह, मनीष विठलानी, पंकज विठलानी, मनीष ठक्कर, अल्पेश शाह, दिनेश कारिया, महेश चौहान उपस्थित होते.