| पेण | प्रतिधिनी |
पेण पोलीस व ट्राफीक पोलीस यांची आरोग्य तपासणी डॉ. मनीष वनगे यांच्या सिध्दकला हॉस्पिटल, पेण येथे पार पडली. या दरम्यान प्रत्येकाची परीपूर्ण तपासणी झाली. यात हिमोग्लोबीन, शूगर, एच.बी.ए. 1 सी, बोन डेन्सिटी, ब्लड प्रेशर, वजन, क्लिनिकल तपासणी ई.सी.जी. इत्यादींचा समावेश होता. नंतर सर्व पोलिस कर्मचार्यांना फ्री औषधे दिली गेली. प्रत्येकास स्टिलबर्डची उत्कृष्ठ फेस शिल्ड देण्यात आली. यासाठी रोटरी क्लब ऑफ पेण आरोयनने पुढाकार घेतला.
पोलिसदल प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाची काळजी घेतात, त्यांची आरोग्यतपासणी ही आपलीच बांधिलकी आहे या रोटरीच्या ब्रिद वाक्याला अनुसरून ही तपासणी झाली. यावेळी रोटरी प्रेसिडेंट डॉ. सोनाली वनगे, सेक्रेटरी स्नेहा जोशी, सुबोध जोशी, डॉ. संदीप चौधरी, हेमंत शाह व सिध्दकला हॉस्पिटलचा स्टाफ यांचे आयोजन उल्लेखनीय होते.