। पाताळगंगा । वार्ताहर ।
माजगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून डॉ. ईमरान खान यांच्या हेल्थी हक्स हेल्थ केअर यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी या परिसरातील शेकडो नागरिकांनी आपली तपासणी करुन घेतली.
टाचदुखी, मुरुम आणि डाग, सुरकुत्या, पाठीचा कणा दुखणे, लठ्ठपणा, खांदा दुखणे, केस पडणे, सांधेदुखी, मूत्रपिंडातील असंतुलन, पॅरालीसीस, मधुमेह, अनियमित मासिक पाळी, लैंगिक समस्या, तसेच फिजिओथेरेपी म्हणून पोषण आणि आहार, त्वचा आणि केसांची काळजी, फिटनेस वाढवणे, किगल्स लॅब, पेल्विक लय आदीसंदर्भात मार्गर्दशन तसेच तपासणी करण्यात आली.
यावेळी जयश्री सोनपारते, डॉ. दिपाली पाटील, गौरव भारती, साराब खान, सोहील खान, प्राजक्ता कांबळे तसेच माजगांव सरपंच दिपाली नरेश पाटील, राजेश शिवराम पाटील, सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, जयवंत पाटील, अविनाश कांबळे, एकनाथ पिंगळे, उत्तम भोईर, विलास कांबळे, रमेश जाधव, मंगेश पाटील, किशोर पाटील ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.