पनवेलमध्ये आरोग्य मेळावा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महापालिकेच्या वतीने क्रमांक 1 ते 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या शनिवारी असंसर्गजन्य आजार यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, दुसऱ्या शनिवारी संसर्गजन्य यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही इत्यादींची तपासणी, तिसऱ्या शनिवारी माता बाल तपासणी, यामध्ये गरोदर माता, प्रसूती झालेल्या मातांची तपासणी करण्यात येत आहे.

तर चौथ्या शनिवारी नाक, कान, घसा, सिकलसेल, दंतरोग, उपशामक सेवा, नेत्ररोग, त्वचा आजार याबाबतची विशेष सत्रे घेण्यात येत आहे. या आरोग्य मेळाव्यामध्येच उपचार, संदर्भ सेवा याचबरोबर नागरिकांना आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी वितरण याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच अवयव दान शपथ व नोंदणी, रक्तदान चळवळ विषयीची माहितीही यावेळी देण्यात येत आहे.

या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपक्रमाअतंर्गत विविध कार्यक्रमांची माहिती नागरिकांना दिली. प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला केंद्र शासनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र शासनाने आयुष्यमान भव: अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या वतीने साप्ताहिक आरोग्य मेळावे घेण्यात येत आहेत.

Exit mobile version