सॅनिटरी पॅडचे वाटप
। खांब । प्रतिनिधी ।
दीपक नायट्राईट कं. धाटाव आणि दीपक फाउंडेशन रोहा व मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संस्था रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगाव येथील आश्रम शाळेमध्ये किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मैत्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष निलेश खेळू वारंगे साहेब, उपाध्यक्ष: महेश खांडेकर, खजिनदार नारायण चितळकर, सचिव:राजेश काफरे, सदस्य भारत वाकचौरे तसेच दीपक फाउंडेशनच्या प्रकल्प समन्वयक प्रिती कापसे आणि प्रकल्प स्टेमच्या विषय शिक्षक प्राजक्ता धुमाळ, प्राची शिर्के आणि अमोल जाधव व सानेगाव आश्रम शाळेचे एम. पी. पाटील, मिलिंद पाटील, दिलिप सकपाल, निलेश म्हात्रे, अधिक्षका प्रेरणा मेंगळ, मनिषा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळांमधील सर्व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून, स्त्रियांना होणारा त्रास कसा टाळता येईल हा या उपक्रमाचा उद्देश होता. तसेच, या कार्यक्रमामध्ये मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी आणि सॅनेटरी पॅडचा उपयोग न केल्यामुळे होणारे दुष्पपरिणाम याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
सानेगाव आश्रम शाळेमध्ये सुमारे १५० आदिवासी किशोरवयीन विद्यार्थीनी शिकत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अडचणी व कोणत्याही चांगल्या प्रतीच्या सुखसोई उपलब्ध नसताना त्या मुलींना आपले शिक्षण सुरू ठेवता यावे यासाठी मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश वारंगे यांनी मोलाचा हातभार लावून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. या त्यांचा उपक्रमात समाजातील अनेक सामाजिक संस्था यांनी सहभागी होऊन निःस्वार्थ मदत केली पाहिजे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
