म्हसळ्यात आरोग्य तपासणी शिबीर

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील काळसुरी येथे (दि. 9) मॅनकाईड फार्मा, स्वदेस फाउंडेशन व सार्वजनिक आरोग्य विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने डोळ्यांचे आजार, ॲनिमिया, न्यूरोपॅथी सिकलसेल, उच्च रक्तदाब व मधुमेह या आजारासंबंधी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मॅनकाईड फार्माचे आलोक कुमार व काळसुरी गावचे सरपंच राजेंद्र घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल्ल एकाडे आणि त्यांच्या टीमने मधुमेह ,उच्च रक्तदाब व सिकल सेल या संबंधित तपासणी करून उपचार केले तसेच मॅनकाईड फार्माच्या टीमने न्यूरोपॅथी संबंधी लोकांची तपासणी करून शिबिरामधील करण्यात आलेल्या तपासणी संबंधी डॉक्टरांच्या सल्ल्याने लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले.शिबिर यशस्वी करण्यासाठी काळसुरी गाव विकास समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, स्वदेस मित्र, आशा, पोलीस पाटील त्याचबरोबर स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापकअरुण भट्ट, विशाल वरुटे, शिवतेज ढऊळ, कौस्तुभ कांबळे, विवेक गांधाळे यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version