चिरनेरमध्ये आरोग्य तपासणी शिबीर

। चिरनेर । वार्ताहर ।
अभिनव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या आयोजनातून, चिरनेरमध्ये मोफत चुंबक चिकित्सा निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (11) ते 25 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर तसेच श्रीराम उत्सव कमिटीचे सहकार्य लाभत आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी सुरू आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या शिबिरात रुग्णांची तपासणी केली जात आहे. यात हृदयविकार, मधुमेह, लकवा, सांधे दुखी,दमा, सर्दी, वातविकार, पोटाचे विकार, कंबर दुखी, व नाक कान घसा अशा विविध आजारांची तपासणी केली जात आहे. या शिबिराला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती अभिनव मित्र मंडळाच्यावतीने देण्यात आली.

Exit mobile version