। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने मंगळवारी (दि. 22) अलिबगमधील पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी तसेच आयुष्यमान भारत (आभा) कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 40हून अधिक जणांनी सहभाग घेऊन या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांचा निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवामाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर व अलिबाग प्रेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सभासद, पत्रकार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे पत्रकारांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये तलुकापातळीवर आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी दिली.अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोवडेकर यांनी प्रास्तविक केले. अलिबाग प्रेस असोसिएशनचे सचिव राजेश भोस्तेकर यांनी आभार व्यक्त केले. महेश पोरे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचार्यांनी सहकार्य केले.