| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रोटरी क्लब यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या शिबिरात कर्जत पोलीस ठाणे, कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथील महिला कर्मचारी आणि महिला डॉक्टर आदी 60 महिला अधिकारी, सत्कार करण्यात आला. कर्जत रोटरी क्लब यांच्याकडून महिला दिनानिमित्त कर्जत शहरातील महावीर पेठ येथील पंकज डेंटल क्लिनिकमध्ये दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे सचिव विशाल शहा, अरविंद जैन, सचिन ओसवाल, डॉ. प्रेमचंद जैन, दीपचद जैन, डॉ. आदित्य जितेंद्र परमार, जितेंद्र ओसवाल, हुसेन जमाली आदी उपस्थित होते. याप्रसंगी कर्जत शहरातील 170 महिलांची दंत, फिजिओथेरेपी, होमीओपथिक तपासणी डॉ. श्रीपाल जैन, डॉ. भारती जैन, अक्षय गदिया यांनी केली.
दरम्यान, रोटरी क्लबचे वतीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या महिला कर्मचारी, डॉक्टर अशा 45 महिलांचा सत्कार करण्यात आला. कर्जत पोलीस उपअधीक्षक कर्जत पोलीस ठाणे आणि रेल्वे स्टेशनवरील पोलिसांचा सत्कार पोलीस ठाणे येथे जाऊन करण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक खुतीजा शेख यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.
कर्जत येथे महिलांची आरोग्य तपासणी
