‘मंकीपॉक्स’साठी आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

| मुंबई । वृत्तसंस्था ।

मंकीपॉक्सचा विषाणू भारताच्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात आता येऊन पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर राज्य सरकारने याबाबत खबरदारीसाठी आरोग्य यंत्रणेला सूचना जारी केल्या आहेत. विमानतळे बंदरांवरून मंकीपॉक्स रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने आरोग्य अधिकारी यांची नियमित समन्वय ठेवण्याचा सूचना केल्या असून मंकीपॉक्स रुग्णांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो. परंतु, लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तर गंभीर स्वरूप ही धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के असल्याने राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

विलगीकरणासाठी आवश्यक यंत्रणा उभारा
मंकीपॉक्स संदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी अशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्यात. मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे. स्वतंत्र व्हेंटिलेशनची व्यवस्था या रुग्णांसाठी असावी असेही या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.
Exit mobile version