महाड मधील पुरग्रस्तांच्या प्रथमोपचारासाठी २० डॉक्टरांचे आरोग्य पथक तैनात

अंजुमन दर्दमंद संस्थेकडून मदतीचा ओघ सुरु

महाड | प्रतिनिधी |

कोकणासह राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती व संकट,अपघात, दुर्घटना असेल तर सर्वप्रथम मदतीसाठी धावणाऱ्या महाड मधील अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट महाड मधील पुरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सरसावली असून बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु व आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे.
महाड शहरात दि.२२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापूरात हजारो कुटुंब उध्वस्त झाली संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने करोडोंचे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर पुरग्रस्त २ हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. ही मदत करीत असताना केवळ मानवतेची भावना ठेवून हिंदू व मुस्लिम कुटुंबियांना तात्पुरता आधार दिला.
दोन दिवस पुराखाली व त्यानंतर दोन तीन दिवस चिखलात व कचऱ्यात असणाऱ्या पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट च्या वतीने २० डॉक्टरांचे एक आरोग्य पथक बोलावून प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. अंजुमन दर्दमंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट मार्फत सुरु असणाऱ्या मदत कार्याचे महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड यांनी ही कौतुक केले आहे.

Exit mobile version