जन शिक्षण संस्थान रायगडचा पुढाकार
। अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणार्या म्हसळा तालुक्यात सहाय्यक आरोग्य सेवा प्रशिक्षण करू इच्छिणार्या प्रशिक्षणार्थिंसाठी चार महिने कालावधीचे जनरल ड्युटी असिस्टंट प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी म्हसळा येथे संपन्न झाले. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, प्रशिक्षक डॉ. किशोर कोकाटे (श्री सद्गुरू कृपा नर्सिंग होम), प्रा. विनयकुमार सोनवणे, सायली सुभाने (जिल्हा कौशल्य विकास प्रतिनिधी ) सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी सुकन्या नांदगावकर (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण वर्गामध्ये सहाय्यक आरोग्य सेवा प्रात्यक्षिक व मार्गदर्शन डॉ. किशोर कोकाटे व प्रा. विनयकुमार सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.