अदानी समुहातर्फे सुदृढ बालक स्पर्धा

| आगरदांडा | वार्ताहर |

सुदृढ बालक स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बालकाचा विकास कशाप्रकारे असावा व ते सुदृढ कसे बनवावे हा संदेश पोहोचवा म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या वतीने मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत येथील कोळीवाडा अंगणवाडी येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजपुरी ग्रामपंचायत माजी सरपंच हिरकणी गिदी, दिघी पोर्टचे सुरक्षा विभागाचे – प्रशांत पाटील, अदानी फाऊंडेशन चे -अवधूत पाटील, जयश्री काळे अंगणवाडी सेविका विजयता खेऊर, अंगणवाडी सेविका दमयंती घागरी, मदतनीस व पालकवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी मधील शून्य ते सहा वर्षापर्यंत सर्व बालकांचे वजन उंची व दंडघेर मोजण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये राजपुरी कोळीवाड्यातील 179 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालकांच्या विविध तीन गटांमध्ये निवड करण्यात आली व एकूण अठरा सुदृढ बालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका विजयता खेऊर यांनी केले व बालकांच्या पोषण विकास, गरोदर माता यांची काळजी, लहान बालकांचे पोषण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. अदानी फाऊंडेशन चे अवधूत पाटील यांनी एक हजार दिवस पोषण व चौरंगी आहार याबद्दल माहिती दिली. दिघी पोर्टचे प्रशांत पाटील यांनी पालकांनी आपल्या बालकांच्या पोषण विकास करण्यासाठी सक्रियतेने सहभाग घेऊन विकास घडवावा असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामसखी दामिनी घागरी यांनी केले.

Exit mobile version