| आपटा | प्रतिनिधी |
वावेघर ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याच्या साम्राज्य पसरले आहे. येथील सर्व कचरा रस्त्यावर आला असून, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व कचरा वावेघर नाल्यात फेकून दिला जात असल्याने कचऱ्याचा ढीग साचलेला दिसून येत आहे. परिणामी, या कचऱ्यामुळे पातळगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत असून, याकडे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दांड फाटाकडे जाताना डाव्या बाजूला स्मशानभूमीजवळ तसेच सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. याबाबतीत ही ग्रामपंचायत काहीच कारवाई करत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.







