कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग-वडखळ मार्गावर निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या कार्लेखिंड येथील लहान मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञाताकडून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. ओला कचरा मोठ्या प्रमाणात टाकत असल्याने ते कुजल्यामुळे कुबट व घाण वास येत असतो, यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांनाच नाक धरून प्रवास करावा लागत आहे. कचऱ्यात ओल्या मच्छीची घाण, चिकनची घाण, कुजलेला फळे व भाजीपाला तसेच इतर मेलेले प्राणी याठिकाणी टाकत असल्याने ते कुजूल्यामुळे दुर्गंधी पसरून घाण वास येत असल्याने भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे. सदर कचरा टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वनविभागाने कडक कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
सदर ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे, तरीही यापुढे कोणी कचरा टाकताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
– तुकाराम जाधव, अलिबाग वनविभाग परिमंडळ वनाधिकारी