| मुंबई | प्रतिनिधी |
अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार सोबत घेत शरद पवारांची साथ सोडली होती. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता.
काही काळानंतर कोर्टाने नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले होते. मात्र, आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. सुनावणीच्या सुरुवातील शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल यांनी मला सुनावणीसाठी 2 तास लागतील अशी माहिती दिली. यावर कोर्टाने तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणाचा युक्तिवाद करणार आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर वकिलांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर आता 21 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आता 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यावेळी अजिप पवारांचे वकील पक्षातून बाहेप पडलेले आमदार अपात्र कसे नाहीत याबाबत युक्तीवाद करणार आहेत. तर शरद पवारांच्या वतीने पक्ष सोडताना या आमदारांनी नियमांचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी याबाबत मागणी करणार आहेत. या सुनावणीनंतर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







