| उरण | वार्ताहर |
उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील विविध गावामधून गेल इंडिया कंपनी कडून प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन प्रकल्प जात आहे. या प्रकल्पाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर बहुउद्देशीय सभागृह जेएन पीए येथे (दि.18) दुपारी 2.30 वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.
गेल इंडिया कडून या सुनावणीच्या नोटिसा शेतकर्यांना बजावण्यास सुरवात झाली असून या नोटिसीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सदर सुनावणीस शेतकरी स्वतः अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी यांनी आपल्याकडील मुळ कागदपत्रासह वेळेत हजर राहण्याची विनंती केलेली आहे. तसेच आपण अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी वरील दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून पुढील योग्य ती कार्यवाही या कार्यालयाकडून करणेत येईल.







