सत्तासंघर्षावर सुनावणी चालू

। मुंबई । वृत्तसंस्था ।

आज दुपारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पटलावर घेण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हा प्रकरण सुचीबद्ध केले आहे. राज्यातील नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे प्रकरण कोर्टात गेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सत्ता संघर्षाचा पेच अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी म्हणून शिवसेनेतर्फे सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मान्य करत हे प्रकरण पटलावर घेण्यात आले आहे. त्यामुळे कोर्ट नेमका काय निर्णय देणार की हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान आज कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे दोघे बाजू मांडणार आहेत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार असून, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडणार आहेत.

या मुद्दयांवर असणार लक्ष

Exit mobile version