युवकांमधील हृदय रोग वा मधुमेह चिंताजनक

डॉ.तात्याराव लहाने यांचे मत
संजीवनी आरोग्य संस्थेत कलर डॉपलर,सोनोग्राफी यंत्र

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
अलिकडे चाळीशीतच युवकां मधे हृदय रोग वा मधुमेह चे वाढते प्रमाण चितांदायक असल्याचे मत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. यासाठी व्यसनाधिनते पासून दूर रहा असे आवाहन मुरुड येथील श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने हेल्थ केअर अ‍ॅड वेलफेअर सेंटर मध्ये 2 डी इको कलर डॉपलर, सोनोग्राफी यंत्राचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ . लहाने यांनी वाढत्या व्यसनाधिनते विषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तंबाखू, सिगरेट, दारू आदी व्यसनांमुळे शरीरातील एकेक अवयव होत असतो. मधुमेहींनी साखर वर्ज करून पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग वा मांसाहार करत सारखे पदार्थ शरीराची नासाडी करतात असे त्यांनी निदर्शनास आणले. यासाठी हिरव्या पालेभाज्या व माशांचे सेवन करा, असे आवाहन केले.
संजीवनी आरोग्य केंद्राला देणगीदारांचे विशेष ऋण व्यक्त करून एका छताखाली सर्व आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करु असे सुचित यावेळी मुख्याधिकारी पंकज भुसे, उद्योजक दिलावर महाडकर, डॉ. रागिणी पारेख,डॉ. कोकाटे, विजय सुर्वे,डॉ. विक्रमजीत पाडोळे, डॉ. के. के. मोरे, डॉ. सौरभ पाटील,डॉ.अपूर्वा पाटील, डॉ. संजय पाटील, जयंत चौलकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, किर्ती शहा, अजित गुरव, सुबोध महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करतांना कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी साडे वर्षात संस्थेच्या उभारणीत अध्ययावत आरोग्य यंत्रणा केवळ देणगीदारांच्या मदतीने उभी राहीली याचा सार्थ अभिमान आहे. मुरुड सह श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांतुन 20 रुग्णांना डायलिसीस सेवा दिली जात आहे. या प्रसंगी उद्योजक दिलावर महाडकर यांनी सोनोग्राफी मशीन साठी 5 लाख. रुपये देणगी दिल्या बद्दल डॉ. लहाने यांच्या हस्ते त्यांचा शाल, देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याधिकारी पंकज भुसे आपल्या भाषणात म्हणाले की, नगरपरिषद ही शहरातील नागरिकांची पालक संस्था असते. या आरोग्य संस्थेला आर्थिक हातभार लागावा म्हणून दरमहा वा प्रति वर्षीअंशदान सुरु करण्याची ग्वाही दिली.

डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शना खाली ही संस्था सर्वांच्या मदतीचा हात घेऊन संस्था वाटचाल करीत असल्याचा निर्वाळा कोकाटे यांनी दिला. यावेळी डॉ . मोरे, डॉ. अपुर्वा पाटील, डॉ संजय पाटील, जयंत चौलकर यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचलन रश्मी साठे यांनी तर आभार प्रदर्शन राशीद फहीम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन अंबुर्ले, जहूर कादिरी अजित गुरव, प्रमोद भायदे , आदेश दांडेकर शशिकांत भगत शकील कडू अमित तसेच संजीवनी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version