| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जवळील धामोते गावातील अडीच वर्षीय बाळाचा कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने मृत्यू झाला आहे. कार्तिक अमोल विरले या बाळाला अल्प वयात कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते आणि आठ महिन्यांच्या प्रदीर्घ उपचारानंतर या बालकाचा मृत्यू झाला. धामोते गावाचे रहिवाशी असलेले आणि नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांचे नातू आणि अमोल राजेंद्र विरले यांचे सुपुत्र कार्तिक याला जानेवारी महिन्यात ताप आला होता. हा ताप तब्बल महिनाभर निघाला नाही आणि नंतर निदान कॅन्सर असे झाले होते. मागील दोन महिने या बालकावर नवी मुंबई खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अनेक महिने उपचार करून देखील कार्तिक विरले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.







