हृदयद्रावक घटना ! शाळकरी मुलाने बंदुकीची गोळी झाडत संपवले जीवन

सतरा वर्षीय मुलाच्या आत्महत्येने खळबळ

 

| महाड | उदय सावंत |

महाड शहरातील तांबट आळी येथील एका इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण महाड शहर हादरले असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुयश सुनील नगरकर (17) असे मृत मुलाचे नाव आहे.

महाड शहरातील तांबट येथील सुनील नगरकर यांचा मुलगा सुयश नगरकर (17) हा महाडमधील दगडूशेठ पार्टे विद्यालय या शाळेमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, तो शाळेत जात नव्हता.  इयत्ता दहावीला असलेला सुयश हा गुरुवारी दुपारी घरी आला असता. त्याने घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवरच गोळी झाडून जीवन संपवले. ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली त्या इमारतीच्या एका गाळ्यामध्येच मृत सुयश याच्या वडिलांचा सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीचा व्यवसाय आहे. याच ठिकाणी त्याची आई देखील काम करत होती. वरून कसला तरी आवाज आला म्हणून खालच्या फ्लॅट मध्ये राहणारी त्याची चुलती धावत गेली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुयश दिसून आला. 

या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. घटनेचे वृत्त पोलिसांना समजतात महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने धाव घेतली. प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर सुयश याचे शव महाड ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. या घटनेने परिसरामध्ये शोककळा निर्माण झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करणार आहेत. या विद्यार्थ्याने एवढी टोकाची भूमिका का घेतली याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Exit mobile version