हृदयद्रावक घटना ! विजेचा शॉक लागून दोन युवकांचा मृत्यू

| वर्धा | वृत्तसंस्था |

वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूर येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या डीजेचालकांनी केला. यावेळी विजेच्या हायपॉवर विद्युतचा धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज चिंदूजी बावणे (27) आणि सेजल किशोर बावणे (13) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. 

दहीहंडीच्या उत्सवाची जोरदार आणि जल्लोषात तयारी सुरू असतानाच, आपल्या नवीन डीजे व्यावसायाचा शुभारंभ झाल्याने सर्वचजण खुश होते. दहीहंडीमध्ये एकदम नाद खुळा डीजे वाजवला जाईल, या आनंदात डीजेची तपासणी करण्यासाठी सूरज आणि सेजल गेले होते. नवीन डीजेला दहीहंडी उत्सवाची ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी  सुरू केली होती. याकरिता विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना विजेचा शॉक बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले, सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरच्यांना हे दोघे अजून कसे आले नाहीत असा प्रश्न पडल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यावेळी, पाहणी केल्यानंतर दोघेही विद्युत तारेला चिकटल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या निधनाने दहीहंडी उत्सवावर दु:खाचे विरजण पडले. दोघांच्या अशा अपघातील मृत्युने परिसरात शोककळा पसरली, तसेच दहीहंडी उत्सावाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले. याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

Exit mobile version