| श्रीवर्धन | वार्ताहर |
महाड येथील कुंभार आळी येथे राहणारे एक कुशल संघटक, कोमसाप, महाडचे सक्रीय लेखक, कथाकथनकार, अभिनेते, उद्योजक आणि महिकावतीचे मंदिर उभारणार्यांपैकी एक तरुण उमेश अशोक मिंडे यांचा त्यांच्या विविधांगी विधायक कार्याच्या गौरवार्थ नुकताच महाड येथील महिकावती मंदिरामध्ये हृद्य असा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
त्यांना अण्णासाहेब सावंत को-ऑप. अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, अस्मिता जंगम यांच्या हस्ते शाल देऊन, सुदेश कळमकर यांच्या हस्ते पुस्तक देऊन उचित सत्कार करण्यात आला. लक्ष्मण कांचन संस्कार केंद्र, विघवलीचे संचालक अ.वि. जंगम यांनी त्यांना चंदनाचे खोड भेट दिले. तसेच श्री. जंगम यांनी मुंडे यांच्या साहित्यिक कार्याचा, अभिवाचन आदल गुणांचा आढावा घेऊन गौरव केला. नवोदित लेखकांना प्रेरणा मिळावी या हेतुने लक्ष्मण कांचन संस्कार केंद्र गुणीजनांचे कौतुक करते, असेही जंगम यांनी सांगितले.कोमसाप, महाडचे अध्यक्ष गंगाधर साळवी, दीपक सकपाळ, नरेंद्र महाडिक, मानसी मराठे, कांचन व नीता शेठ आदी सदस्य व महिकावती मंदिराचे पदाधिकारी उदय फुटाणकर, संसारे सर, गणेश करजावकर, गांगल आदी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.