राज्यात पावसाची दमदार एन्ट्री

पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

| मुंबई | प्रतिनिधी |

अनेक दिवसांपासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पवासाचे अखेर राज्यात आगमन झाले आहे. उकाडा आणि आर्द्रतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनाही पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच मुंबईत विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून त्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे.

पुढील तीन-चार दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून त्यासोबतच सरासरी 50-60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर, रत्नागिरीसाठी आज ऑरेज अलर्ट असून त्यामध्ये 100 मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो, असाही अंदाज वर्तवतण्यात आला आहे. सिंधुदुर्गासाठी देखील आज रेड अलर्ट असून काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

राज्यातील अनेक भागात मुसळधार
आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये. आजपासून कोकणासह मुंबईतत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि साता-या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. रायगडमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस
झाला आहे . रायगडमध्ये सकाळपासून आता ढगाळ वातावरण आहे. पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version