खेड तालुक्यात जोरदार वृष्टी

नदीकाठच्या नागरिकांना इशारा

। खेड । वार्ताहर ।

गेले दोन दिवस पावसाने खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवारी दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे. तालुक्यातील निळीक भुवडवाडीतील घरावर शनिवारी (ता. 6) रात्री घरावर दरड कोसळून नुकसान झाले आहे.

शनिवारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काही गावांना जोडणार्‍या रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शेतकरी खुष

पावसाअभावी शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली होती. शेतात केलीली लावणी फुकट जाण्याच्या भीतीने शेजारी हवालदिल झाले होते. कधी एकदा पावसाचे पुनरागम होत आणि धोक्यात आलेली शेती वाचते हा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला होता.

Exit mobile version