| सिमला | वृत्तसंस्था |
अतिवृष्टी, भूस्खलन यामुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
विभागाने या सात राज्यांसाठी 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने हिमाचल आणि उत्तराखंड येथे 115.6 ते 204.4 मि मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या काळात बाधित भागात पूर आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचे सांगितले. याशिवाय वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.
या राज्यांमध्ये 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत अतिवृष्टी अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.