राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

| रायगड | वार्ताहर |

महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मागच्या 48 तासांमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रात पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरू असतानाच हवामान खात्याने पुढच्या 3 तासांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन तास पाऊस जोरदार बरसेल, तसेच वारा 40-50 किमी प्रति तासाच्या वेगाने वाहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे मुंबई-ठाण्यामध्येही पुढच्या 24 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावं, असे आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाने केले आहे.

Exit mobile version