रायगडसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. अशातच आता पुढील आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version