मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले

| पनवेल | वार्ताहर |
गेल्या 24 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात चांगले झोडपून काढले आहे. नेहमी प्रमाणे परिसरातील अनेक भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या . सखल भागात पाणी साचले असून, दुचाकीसह चार चाकी वाहने बंद पडल्याच्या घटना सामोरे आल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता या पावसाचा आनंद बच्चे कंपनीने भिजून घेतला.

पनवेल शहरासह कामोठे, पळस्पे ,कळंबोली , खारघर , करंजाडे,खांदा वसाहत आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहन चालकाचे चांगलेच हाल झाले होते . तसेच मानसरोवर रेल्वे स्थानकात सुद्धा पाणी तुंबल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत . पनवेल परिसरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु असल्याने व त्यातच खोद कामे सुरु असल्याने ग्रामीण भागात सुद्धा पाणी तुंबल्याचे प्रकार वाढले होते. नव्याने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या कामामुळे त्या परिसरात असलेल्या पारगाव, डुंगी गाव मध्ये सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात साठले होते. साधारण पणे आता पर्यत 172. 20 मि. मि सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

या पावसाळा सामोरे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिका मार्फत व तहसीलदार कार्यालय यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून 022-27452399, भ्रमणध्वनी – 8369899902 येथे सपंर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version