| मिझोराम | वृत्तसंस्था |
मिझोरामची राजधानी आयझॉलच्याजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे खाण कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 10 कामगारांना जीव गमवावा लागला आहे. आणखी काही लोक अडकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत, असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरात सतत पाऊस पडत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी 6 च्या सुमारास आयझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या मेल्थम आणि हॅलिमेन दरम्यानच्या भागात घडली. अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग 6 वर भूस्खलन झाले. याशिवाय अनेक आंतरराज्य महामार्गांनाही भूस्खलनाचा फटका बसला आहे.
मिझोराममध्ये पावसाचा धुमाकूळ! खाण कोसळल्याने मोठी दुर्घटना; दहा कामगारांचा मृत्यू
